Devendra Fadnavis | संप चिघळू नये, असं आम्हालाही वाटतं : देवेंद्र फडणवीस

| Updated on: Nov 10, 2021 | 7:24 PM

'एसटी संपाबाबत सरकारची भूमिका असंवेदनशील. संप चिघळू नये असं आम्हाला वाटतं पण सरकार दमनशाहीचा वापर करत आहे. हे आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न होत असेल तर ते अजून वाढेल. चर्चेतून मार्ग काढला पाहिजे. कर्मचाऱ्यांना दिलासा द्यायला हवा. राज्य सरकारनं तात्काळ चर्चा करुन यावर तोगडा काढायला हवा. आम्ही सरकारला पूर्ण सहकार्य करायला तयार. आमचे आमदार गोपीचंद पडळकर, इतर सर्व आमदार, सदाभाऊ खोत आंदोलनात आहेत. सरकारनं संवेदनशीलता दाखवावी', असं आवाहन फडणवीस यांनी ठाकरे सरकारला केलंय.

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याच्या मार्गावर आहे. मुंबईतील आझाद मैदानात राज्यभरातील एसटी कर्मचारी जमायला सुरुवात झालीय. यावेळी भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी परिवहन मंत्री अनिल परब आणि ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ठाकरे सरकारला लक्ष करत एसटी कर्मचारी संपावर तोडगा काढण्याबाबत सल्लाही दिला आहे.

‘एसटी संपाबाबत सरकारची भूमिका असंवेदनशील. संप चिघळू नये असं आम्हाला वाटतं पण सरकार दमनशाहीचा वापर करत आहे. हे आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न होत असेल तर ते अजून वाढेल. चर्चेतून मार्ग काढला पाहिजे. कर्मचाऱ्यांना दिलासा द्यायला हवा. राज्य सरकारनं तात्काळ चर्चा करुन यावर तोगडा काढायला हवा. आम्ही सरकारला पूर्ण सहकार्य करायला तयार. आमचे आमदार गोपीचंद पडळकर, इतर सर्व आमदार, सदाभाऊ खोत आंदोलनात आहेत. सरकारनं संवेदनशीलता दाखवावी’, असं आवाहन फडणवीस यांनी ठाकरे सरकारला केलंय.

Gopichand Padalkar | एसटीतील वसुलीचा पैसा थेट मातोश्रीवर जातो : गोपीचंद पडळकर
Uddhav Thackeray | तुमच्या मागण्यांबाबत शासन प्रयत्नशील, सीएमचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन