Gunratna Sadavarte | आमदारांची स्पष्ट फसवणूक झाली, आझाद मैदानातून गुणरत्न सदावर्तेंचा आरोप

| Updated on: Nov 24, 2021 | 9:58 PM

आझाद मैदानावर मागील 15 दिवसांपासून ठाण मांडून बसलेले एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहे. या कर्मचाऱ्यांचं नेतृत्व करणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन भूमिका जाहीर करु असं सांगितलं आहे. तर एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने हायकोर्टात लढा देणारे अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते विलिनीकरणावर ठाम आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. मात्र, आझाद मैदानावर मागील 15 दिवसांपासून ठाण मांडून बसलेले एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहे. या कर्मचाऱ्यांचं नेतृत्व करणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन भूमिका जाहीर करु असं सांगितलं आहे. तर एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने हायकोर्टात लढा देणारे अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते विलिनीकरणावर ठाम आहेत.

बैठकांचं सत्र पार पडल्यानंतर बुधवारी संध्याकाळी अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन पगारवाढीची घोषणा केली आहे. या पत्रकार परिषदेला आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत उपस्थित होते. त्यावेळी पडळकर आणि खोत यांना पत्रकारांनी सरकारचा निर्णय मान्य आहे का? असा सवाल केला. त्यावेळी आझाद मैदानावर जाऊन कर्मचाऱ्यांसमोर सरकारचा प्रस्ताव मांडू. त्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्याशी चर्चा करुन संपाची पुढील दिशा स्पष्ट करु, असं त्यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेनंतर पडळकर आणि खोत आझाद मैदानावर दाखल झाले. त्यावेळी मोठा गोंधळ पाहायला मिळाला. आजची रात्र आम्ही आझाद मैदानावरच घालवणार आहोत. प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याशी चर्चा करुन आंदोलनाची पुढील दिशा सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेत जाहीर करु, असं पडळकर आणि खोत यांनी सांगितलं.

Published on: Nov 24, 2021 09:05 PM
Sadabhau Khot | एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन उद्या निर्णय घेणार, सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया
Special Report | एसटीचा संप मागे की सुरुच राहणार? उद्या निर्णय होणार