एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच; सोलापूर बसस्थानकात शुकशुकाट

| Updated on: Nov 25, 2021 | 12:47 PM

आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अखेर बुधवारी राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्याचा निर्णय घेतला. मात्र वेतनवाढीनंतरही कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत.

सोलापूर : आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अखेर बुधवारी राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्याचा निर्णय घेतला. मात्र वेतनवाढीनंतरही कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. जोपर्यंत विलीनीकरण होणार नाही, तोपर्यंत संप  मागे घेणार नसल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. दरम्यान कर्मचारी संपावर असल्याने सोलापूर बसस्थानकात सर्वत्र शुकशुकाट पहायला मिळाला.

लाकूड व्यापाऱ्याच्या मुलीने उंचावली नांदेडकरांची मान; दीपा यांची सैन्यदलात निवड
खोत-पडळकरांना महाराष्ट्रातील एसटी कामगार ‘आझाद’ करत आहे : गुणरत्न सदावर्ते