Anil Parab Live | निलंबन, सेवा समाप्ती मागे घेणार, अनिल परब यांची पत्रकार परिषदेत माहिती
गेल्या 17 दिवसांपासून संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना इतिहासातील सर्वात मोठी पगार वाढ देण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना तब्बल 41 टक्के पगारवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या 17 दिवसांपासून संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना इतिहासातील सर्वात मोठी पगार वाढ देण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना तब्बल 41 टक्के पगारवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर परिवहन मंत्री अनिल परब यांनी कामगारांच्या पगारांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक केल्याचंही जाहीर केलं. कामगारांना पगारवाढ देण्याबरोबरच त्यांचे निलंबन आणि सेवा समाप्तीही मागे घेतल्याचं जाहीर केलं.अनिल परब यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषद घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना पगार वाढ देत असल्याचं जाहीर केलं. तसेच इतिहासातील ही सर्वात मोठी पगारवाढ असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. विलीनीकरणाचा निर्णय समितीने सरकारडे दिला तर तो मान्य असेल. पण तो निर्णय येईपर्यंत किंबहूना निर्णय होईपर्यंत तिढा असाच ठेवता येणार नाही. त्यामुळे सरकारने कामगारांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ त्यांच्या मूळ पगारात करण्यात येणार आहे, असं परब यांनी स्पष्ट केलं.