आझाद मैदानावरील नाराजीनाट्यानंतर पडळकर-खोत फडणवीसांच्या भेटीला
आझाद मैदानावरील नाराजी नाट्यानंतर गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मात्र त्यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समोर आलेले नाही.
मुंबई : एका व्हायरल मेसेजमुळे भाजप आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि एसटी कामगारांमध्ये संशयाचं वातावरण निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. पडळकर-खोत यांनी या आंदोलनातून अंग काढून घेण्याचा निर्णय घेतला. एसटी कामगारांनी त्यांना रोखल्याने ते आंदोलनातून बाहेर पडले नाही. परंतु या नाराजी नाट्यानंतर गोपीचंद पडळकर आणि खोत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर त्यांची बैठकी झाली.