मागचं लाईट बील भरायचं नाही अन् पुढचं…, धनंजय मुंडेंचा शायरीतून विरोधकांवर घणाघात

| Updated on: Sep 08, 2024 | 11:41 AM

परळी शहरामध्ये नाथ प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाचं नामांकित सिनेतारकांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं आहे. रश्मिका मंदाना आणि कृती सेनोन यांच्या उपस्थित कार्यक्रमाची सुरुवात झाली. नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरवात झाली.

शेतकरी हा सरकारचा लाडका आहे, असं वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. मागचं लाईट बील भरायचं नाही अन् पुढचं द्यायचं नाही. पाऊस कमी पडो किंवा जास्त तरी कृषीमंत्र्यांना शिव्या खाव्या लागतात, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधकांवर शायरीच्या माध्यमातून चांगलाच हल्लाबोल केला आहे. विरोधकांच्या टीकेवर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, ‘शेतकरी सरकारचा लाडका झाला आहे. मागचं लाईट बील भरायचं नाही अन् पुढचं द्यायचं नाही. पाऊस जास्त झाला तर शिव्या कृषीमंत्र्याला खाव्या लागतायत. पाऊस कमी पडला तरी उच्क्या कृषीमंत्र्यालाच लागतात. आणि अतिवृष्टी झाल्यानंतर उचक्याही लागतात आणि पोटही दुखतं. .’ पुढे ते असेही म्हणाले, मी आधीच कृषीमंत्री त्यामुळे पाचवीला पुजलेला आहे. कृषीमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे अशी टीका केली जाते. नर्तिकेला नाचवलं म्हणून तुझ्या पोटात का दुखतं? असा सवाल करत त्यांनी निशाणा साधला आहे.

Published on: Sep 08, 2024 11:41 AM
Maharashtra Weather : आज अन् उद्या धुव्वाधार, राज्यातील ‘या’ भागात अतिवृष्टीचा इशारा; काय सांगतंय हवामान खातं?
Pune Ganeshotsav : ओम नमस्ते गणपतये… तब्बल ३१ हजार महिला एकत्र, अथर्वशीर्ष पठणातून केलं गणरायाला नमन