ठरलं? येत्या 14 तारखेला राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार, शिंदे अन् दादांच्या मंत्र्याची यादी दिल्लीत?

| Updated on: Dec 11, 2024 | 10:47 AM

येत्या १६ तारखेला नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यापूर्वी १४ तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची यादी अंतिम शिक्कामोर्तबसाठी दिल्लीला पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

येत्या १४ तारखेला राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. त्या आधी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्याची यादी दिल्लीत पाठवल्याची माहिती मिळतेय. येत्या १६ तारखेला नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यापूर्वी १४ तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची यादी अंतिम शिक्कामोर्तबसाठी दिल्लीला पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या हायकमांडचा ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर विस्ताराचा मार्गही मोकळा होणार आहे. दिल्लीत पाठवलेल्या शिंदेच्या यादीमध्ये उदय सामंत, शंभूराज देसाई, तानाजी सावंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, राजेश क्षीरसागर, प्रकाश सुर्वे, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, भरत गोगावले, हेमंत पाटील यांची नावं असल्याचे कळतंय. वादग्रस्त चेहऱ्यांना पुन्हा संधी नको अशी भूमिका भाजप हायकमांडची असल्याची माहिती आहे. त्यामुळे तानाजी सावंत यांचं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला १० मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. त्या यादीमध्ये कोणाची नावं आहे बघा स्पेशल रिपोर्ट?

Published on: Dec 11, 2024 10:47 AM
बीडमध्ये हिंसक वातावरण, आंदोलकांची जाळपोळ अन् मस्साजोग गावाला मनोज जरांगे पाटलांची भेट
पवारांवर टीका करताना पडळकर अन् सदाभाऊ खोतांची जहरी टीका, मारकडवाडीतून थेट हल्लाबोल