‘तर पुन्हा आंदोलन करा’, जुन्या पेन्शनसाठी संपात असलेल्या संघटनेला मुख्यमंत्र्यांनी कोणता दिला शब्द?
VIDEO | गेल्या तीन दिवसापासून जुनी पेन्शन लागू करावी, म्हणून राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपातून तिसऱ्या संघटनेची माघार, काय मांडली भूमिका
मुंबई : गेल्या तीन दिवसापासून जुनी पेन्शन योजना लागू करावी, म्हणून राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांचा अद्याप संप सुरूच आहे. विविध संघटना या कामबंद आंदोलनात सहभागी आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी दोन संघटनांनी या संपातून माघार घेतली होती. आता तिसरी नगरपरिषद सवर्ग कर्मचारी संघटनेने देखील माघार घेतली आहे. या संघटनेने माघार घेतल्यानंतर त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान मुख्यमंत्र्यांनी जुनी पेन्शन योजनेबाबत जी समिती स्थापन केली आहे. या समितीमार्फत जुनी पेन्शन योजनेबाबत जो निर्णय होईल त्याच दिवसापासून तो निर्णय लागू करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. तर जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, यासाठी संपात सहभागी असलेल्या शासकीय संघटनांनी नगरपरिषद सवर्ग कर्मचारी संघटनेचा कोणताही विचार न केल्याने ही संघटना संपातून बाहेर पडल्याचे सांगतिले जात आहे.