राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून समीर वानखेडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

| Updated on: Feb 20, 2022 | 9:37 AM

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या  मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे शहरातील कोपरी पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या  मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे शहरातील कोपरी पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वयाच्या 17 व्या वर्षी आपल्या नावावर बार परवाना घेतल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून या आधीच समीर वानखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बाजवण्यात आली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबईतील वाशी येथून गुन्हा वर्ग केल्यानंतर कोपरी पोलिस ठाण्यात कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार परवाना घेण्याच्या वेळी वय कमी असल्याने ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या आदेशाने समीर वानखडे यांच्या वाशी येथील सतगुरु बारचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात आला आहे.

राजकारणात जो आपला विरोध करतो तो उद्या आपल्या सोबतही असेल : भगतसिंह कोश्यारी
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसाचं संकट