Nawab Malik | महामहिम राज्यपाल दोन पॉवर सेंटर निर्माण करण्याच चित्र स्पष्ट करत आहे का ? : मलिक
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील संघर्ष काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्हा दौऱ्यातील कार्यक्रमांविर तीव्र आक्षेप घेतलाय.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील संघर्ष काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्हा दौऱ्यातील कार्यक्रमांविर तीव्र आक्षेप घेतलाय. राज्यपाल कोश्यारी यांचा 5 तारखेला नांदेड दौरा नियोजित आहे. या दौऱ्यात ते राज्य सरकारनं केलेल्या कामांचं उद्धाटन करणार आहे, हे गैर आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत राज्याचे मुख्य सचिव राज्यपालांच्या सचिवांशी चर्चा करुन हा कार्यक्रमात बदल करतील अशी अपेक्षा अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केलीय.