कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची राज्यातील ‘या’ सहा जिल्यात एन्ट्री, आरोग्यमंत्री म्हणाले…

| Updated on: Apr 03, 2023 | 10:10 PM

VIDEO | कोरोनाचा नवा व्हेरियंट महाराष्ट्राच्या सहा जिल्ह्यांमध्ये पोहोचला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली आणि म्हणाले...

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असताना महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ते म्हणाले, हा व्हेरियंट राज्यातील तब्बल सहा जिल्ह्यांमध्ये पसरला आहे. पण तरीही नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. कारण सध्या तरी तशी परिस्थिती नाही आणि कोरोनाचा नवा व्हेरियंट फार घातक आहे, असे सध्या तरी निदर्शनास आलेलं नसल्याचं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. पण तरीही आरोग्यमंत्र्यांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. “या व्हेरियंटची 6 जिल्ह्यांमध्ये वाढ झालीय. सोलापूर, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांत नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. याच ठिकाणी स्प्रेडर आहेत. पण एकही रुग्ण व्हेंटिलेटर किंवा आयसीयूत नाही. “मास्क वापरण्याची सक्ती राज्यात नाही. आम्ही आवाहन करत आहोत ज्याला त्रास होतोय त्यांनी मास्क वापरावा”, अशी माहिती तानाजी सावंत यांनी दिली.

Published on: Apr 03, 2023 10:10 PM
गोरेगाव पत्राचाळ प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; बघा काय आहे महत्त्वाचं अपडेट?
मोहोळ कृषी बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होणार