संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष महायुतीसोबत! राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काय केला दावा?

| Updated on: Aug 25, 2023 | 3:29 PM

VIDEO | राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे शंका व्यक्त करत म्हणाले, 'काही लोकांची पाऊलं एनडीएकडे वळताय, अशी शंका आहे. तर विरोधकांची आघाडी इंडिया किती एकत्र पाहते हे पाहणं आवश्यक आहे'

पुणे, २५ ऑगस्ट २०२३ | शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमचे नेते असल्याचे विधान केले आहे. शरद पवार यांच्या या विधानानंतर कुणीही संभ्रमात राहण्याची गरज नाही. तर संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष महायुतीसोबत आहे, असा मोठा दावा आज राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुण्यात केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे का? असा प्रश्न विचारताच उदय सामंत म्हणाले, दुसऱ्या पक्षावर बोलण्याचा मला अधिकार नाही. मी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम केले आहे. पक्ष सोडल्यानंतर नेत्यांवर तोंडसूख घेणाऱ्या नेत्यांपैकी मी नाही. अजित पवार हे आमचे व राज्यातील महत्त्वपूर्ण नेते आहेत. काही लोकांची पाऊलं एनडीएकडे वळताय, अशी शंका आहे. तर विरोधकांची आघाडी इंडिया किती एकत्र पाहते हे पाहणं आवश्यक आहे, असेही उदय सामंत म्हणाले.

Published on: Aug 25, 2023 03:29 PM
इंडिया टुडे सी व्होटरनुसार राज्यात ‘मविआ’ ‘महायुती’ वर भारी! काय सांगतो सर्वे?
शरद पवार यांचं ‘त्या’ वक्तव्याबाबत अवघ्या पाच तासात यू-टर्न; म्हणाले, ‘मी असं बोललोच नाही’