मतदार कुणातं मटण खातात, बटण कुणाचं दाबतात समजत नाही, Gulabrao Patil यांचं वक्तव्य
इलेक्शन लागले की मतदार सकाळी शिवसेनेचे मटण खातात, दुपारी भाजपची शेव भाजी खातात व रात्री काँग्रेसची जेवणं करतात व वरुन सर्वांशी संबंध असल्याचे सांगत कुणाचं मटण खातात आणि कोणाचा बटन दाबतात ते समजत नाही अशी प्रतिक्रिया ही शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
जळगाव : स्त्यांबाबत अभिनेत्रीचे नाव घेवून चुकीचं बोलून गेलो. त्यामुळे आता तो गाल सोडला आणि ओम पुरीचा गाल पकडला. त्यामुळे ओम पुरीच्या गालावर कोणी टीका करू नये असे वक्तव्य राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भुसावळ येथे रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी केले आहे. इलेक्शन लागले की मतदार सकाळी शिवसेनेचे मटण खातात, दुपारी भाजपची शेव भाजी खातात व रात्री काँग्रेसची जेवणं करतात व वरुन सर्वांशी संबंध असल्याचे सांगत कुणाचं मटण खातात आणि कोणाचा बटन दाबतात ते समजत नाही अशी प्रतिक्रिया ही शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.