VIDEO : Kirit Somaiya | उद्धव ठाकरे यांच्या चार महान शिवसैनिकांचे घोटाळे जनतेसमोर आणणार : किरीट सोमय्या
भाजपचे नेते किरीट सोमय्या म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या चार महान शिवसैनिकांचे घोटाळे जनतेसमोर मी आणणार आहे. शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. आज किरीट सोमय्या वाशिम दौऱ्यावर आहेत.
भाजपचे नेते किरीट सोमय्या म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या चार महान शिवसैनिकांचे घोटाळे जनतेसमोर मी आणणार आहे. शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. आज किरीट सोमय्या वाशिम दौऱ्यावर असताना बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याची पाहणी करण्याकरिता या ठिकाणी ते येणार होते. मात्र भावना गवळी यांच्या समर्थकांनी किरीट सोमय्या यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवत त्यांच्या ताफ्यावर दगड फेक केली आहे. दगडफेकीनंतर किरीट सोमय्या घटनास्थळी न थांबताच निघून गेले आहेत. त्याठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.