‘सर्वच राजकीय पक्ष भाजप पक्षात विलीन करावेत’, कुणी लगावला खोचक टोला?
VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात होणाऱ्या आजच्या सुनावणीबद्दल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित दादा यांना मुख्यमंत्री करू असे वक्तव्य केले. या वक्तव्यावर प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य केले आहे. बघा नेमकं काय म्हणाले...
बुलढाणा, ६ ऑक्टोबर २०२३ | राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात आज केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी पार पडणार आहे. दरम्यान, प्रहार संघटनेते नेते आमदार बच्चू कडून यांनी मोठं वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादीच्या संदर्भात होणाऱ्या सुनावणीचा काहीही परिणाम होणार नाही. तर सर्वच राजकीय पक्ष भाजप या पक्षात विलीन करावेत, असा खोचक टोला देखील बच्चू कडू यांनी लगावला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित दादा यांना मुख्यमंत्री करू असे वक्तव्य केले. यावरून बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडू म्हणाले, ‘फडणवीस यांच्या मनात नेमकं काय आहे माहित नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवणार आहे आणि मुख्यमंत्री अजित पवार यांना करत असतील तर मोठा संभ्रम आहे. या दोन्ही पक्षांबद्दल काही ठरवायचे असेल तर देवेंद्र फडणवीस ठरवणार असतील तर हाही मोठा संभ्रम आहे. मला वाटतं सगळे पक्ष विलीन करून भाजपमध्ये गेले पाहिजे, हाच त्यातील चांगला मार्ग आहे.’