Barsu Refinery Project बद्दल शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांचं मोठं वक्तव्य

| Updated on: Sep 12, 2023 | 3:33 PM

VIDEO | सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स आणि पंतप्रधान मोदी यांच्यात बारसू रिफायनरी प्रकल्पावर चर्चा? शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांना विचारलेल्या प्रश्नावर काय केलं महत्त्वाचं वक्तव्य

नवी दिल्ली, १२ सप्टेंबर २०२३ | सामंजस्य करारामुळे कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेल्या रिफायनरी प्रकल्प मार्गी लागणार असून महाराष्ट्राच्या दृष्टीने बारसू हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याचे म्हणत सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स आणि पंतप्रधान मोदी यांच्यात चर्चा झाली. बारसू प्रकल्पामुळे महाराष्ट्राचा जीडीपी वाढण्यास मदत होऊ शकते, तर कोकणातील तरूणांना रोजगार निर्माण होऊ शकेल. हा ग्रीन प्रोजेक्ट आहे. सामंजस्य करारामुळे हा प्रकल्प मार्गी लागण्याची अपेक्षा शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केली. पुढे ते असेही म्हणाले की, बारसूला असणाऱ्या विरोधासंबंधी राज्य सरकार आणि मंत्री उदय सामंत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि या प्रकल्पाबद्दलचे गैरसमज दूर करण्यात येतील. तर बारसू आणि रत्नागिरी येथील नागरिकांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प पुढे नेण्यात येईल, असे राहुल शेवाळे यांन म्हटले.

Published on: Sep 12, 2023 03:33 PM
‘संजय राऊत यांच्या तोंडाला XXX झालाय की काय?’, शिवसेना नेत्यानं केला हल्लाबोल
Bachchu Kadu यांनी रवी राणा यांना दिला इशारा; म्हणाले, ‘…तर मी त्यांना सांगितलं असतं’