Jayant Patil | घरगुती गॅस आणि इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे दोन दिवस आंदोलन : जयंत पाटील
केंद्रसरकारने वाढवलेल्या घरगुती गॅसच्या किंमती, इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आज आणि उद्या राज्यभर आंदोलन पुकारल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. तुमचं सिलेंडर आमच्या घराच्या सुखसमृद्धीत आणि शांतीमध्ये आग लावत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन छेडल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा जयंत पाटील यांनी यावेळी दिला आहे.

सामान्य जनतेचा आक्रोश केंद्र आणि राज्य सरकारसमोर मांडला पाहिजे. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळून राज्यात आंदोलन करण्याचं आवाहन जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. गृहिणींच्या बजेटमध्ये फार मोठं संकट केंद्रसरकारने निर्माण केले आहे. अचानकपणे सिलेंडरचे दर 25 रुपयांनी वाढवले. 20 दिवसाला 809 रुपये तर महिन्याला दीड हजार रुपये सिलेंडरमागे सर्वसामान्य जनतेला द्यावे लागणार आहेत. याचा निषेध करताना जयंत पाटील यांनी आज आणि उद्या राज्यातील जिल्ह्या जिल्ह्यात आणि तालुक्यात आंदोलन करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.