छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची जंगी मिरवणूक, गुलाबराव पाटील यांनी धरला ठेका, बघा व्हिडीओ
VIDEO | पिंप्राळा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, वाजत गाजत शिवरायांची जंगी मिरवणूक अन् मंत्री गुलाबराव पाटील यांनी धरला ठेका
जळगाव, ९ ऑगस्ट २०२३ | जळगावाचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या संकल्पनेतून शहरातील उपनगर पिंप्राळा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्याची स्थापना होतेय. आज महामार्गावरून या पुतळ्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मिरवणुकीपुढे ठेका धरला. यामुळे शिवप्रेमींचा उत्साह वाढलेला दिसून आला. पिंप्राळा येथे महापालिकेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यासाठी किल्ल्याच्या आकाराचा चबुतराही उभारण्यात आला आहे. तब्बल २० फूट उंच असणारा हा पुतळा धुळे येथील शिल्पकार सरमद पाटील यांनी साकारला आहे.
Published on: Aug 09, 2023 11:58 AM