Statue Of Equality : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’चे लोकार्पण

| Updated on: Feb 05, 2022 | 8:56 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ‘स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी’चं लोकार्पण करण्यात आलं. पवित्र मंत्रोच्चाराच्या स्वरात मोदींच्या हस्ते संत रामानुजाचार्य यांच्या मूर्तीचं लोकार्पण करण्यात आलं. सोनं, चांदी, पितळ, तांबे आणि जस्त या शुद्ध पंचधातूने तयार करण्यात आलेल्या या स्टॅच्यू ऑफ इक्वालिटीचं लोकार्पण करण्यात आलं आहे. 200 एकरहून अधिक परिसरात हा पुतळा वसविण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ‘स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी’चं लोकार्पण करण्यात आलं. पवित्र मंत्रोच्चाराच्या स्वरात मोदींच्या हस्ते संत रामानुजाचार्य यांच्या मूर्तीचं लोकार्पण करण्यात आलं. सोनं, चांदी, पितळ, तांबे आणि जस्त या शुद्ध पंचधातूने तयार करण्यात आलेल्या या स्टॅच्यू ऑफ इक्वालिटीचं लोकार्पण करण्यात आलं आहे. 200 एकरहून अधिक परिसरात हा पुतळा वसविण्यात आला आहे. पुतळ्याचं लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हात जोडून संत रामानुजाचार्य यांना अभिवादन केलं. यावेळी साधूसंत आणि मोजकेच पाहूणे उपस्थित होते. रामानुजाचार्य स्वामींचं हे एक हजारावं जयंती वर्ष आहे. त्यानिमित्ताने त्यांची जगातील दुसरी भव्य मूर्ती या ठिकाणी उभारण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्टॅच्यू ऑफ इक्वालिटीचं लोकार्पण करण्यापूर्वी पूजा-अर्चा करण्यात आली. यावेळी पूजाऱ्यांनी मंत्रोच्चार केला. तब्बल 15 मिनिटे ही पूजा चालली. त्यानंतर मोदींनी या संपूर्ण मंदिराची पाहणी केली. यावेळी मोदींनी 108 दिव्य देशम (मंदिर)ची पाहणी केली. चिन्ना जीयर स्वामी यांच्या संकल्पनेतून ही वास्तू उभारण्यात आली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे संपूर्ण मंदिर दाखवू त्याची माहिती दिली. त्यानंतर मदी एका प्रशस्त हॉलसमध्ये पोहोचले. या प्रशस्त हॉलमधील प्रत्येक खांबांवर रामानुजाचार्यांचा जीवनकाळ चितारण्यात आलेला आहे. राजस्थानच्या विशेष कारागिरांनी हे खांब तयार केले आहेत. त्यानंतर मोदी यांच्या हस्ते या मूर्तीचं अनावरण करण्यात आलं.

नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी, रुग्णालयात राहणार
Lata Mangeshkar Health Update : लता मंगेशकर व्हेटिलेटरवर, तब्बेतीची चिंता! दिग्गजांकडून विचारपूस