Amravati | Ravi Rana यांनी अमरावतीत विनापरवानगी बसवलेला शिवरायांचा पुतळा रातोरात हटवला
राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनी अपक्ष आ रवी राणा यांनी विना परवानगीने राजापेठ येथील उड्डाण पुलावर शिवाजी महाराज यांचा बसवलेला पुतळा आज पहाटे प्रचंड पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आला. काल रात्री राजापेठ उड्डाण पुलाचे सर्व रस्ते बंद करण्यात आले. नंतर हा पुतळा काढण्यात आला.
अमरावती : राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनी अपक्ष आ रवी राणा यांनी विना परवानगीने राजापेठ येथील उड्डाण पुलावर शिवाजी महाराज यांचा बसवलेला पुतळा आज पहाटे प्रचंड पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आला. काल रात्री राजापेठ उड्डाण पुलाचे सर्व रस्ते बंद करण्यात आले. नंतर हा पुतळा काढण्यात आला. हा पुतळा महानगर पालिका व पोलीस प्रशासनाने काढला आहे. शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवू नये अशी मागणी युवा स्वाभिमान पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती. या पुतळ्यावरून आता राजकारण चांगलेच तापले असून, आमगाप रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर पोलीस व SRPf चा मोठा बंदोबस्त लावून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. अमरावती महापालिकेत भाजपची सत्ता आहे. या पुतळ्याला महापालिकेने परवानगी द्यावी अशी मागणी रवी राणा यांनी 2 दिवसांपूर्वी महापालिकेत केली होती. पुतळ्यावरून जिल्ह्यात राजकारण चांगलेच तापले असून यात शिव प्रतिष्ठानने उडी घेतल्याचे समजते.