जरांगे पाटलांच्या गावात तुफान दगडफेक, नेमकं काय घडलं? तणावाचं वातावरण अन् पोलीस पथक तैनात
मनोज जरांगे पाटील यांच्या बीडमधील मातोरी या गावात झालेल्या दगडफेकीच्या घटनेत अनेक गाड्यांचं मोठं नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर दगडफेक झाल्याची घटना घडल्यानंतर संपूर्ण गावात तणावपूर्ण वातावरण होते. घडलेल्या घटनेचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.
बीडमधील मनोज जरांगे पाटील यांच्या गावात तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या बीडमधील मातोरी या गावात झालेल्या दगडफेकीच्या घटनेत अनेक गाड्यांचं मोठं नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर दगडफेक झाल्याची घटना घडल्यानंतर संपूर्ण गावात तणावपूर्ण वातावरण होते. घडलेल्या घटनेचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, मातोरी या गावात घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांची दोन पथकं तैनात करण्यात आली आहेत. जरांगे यांच्या मातोरी गावत काल (गुरूवार) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. काल गाड्यांचा ताफा घेवून एक जमाव मातोरी या गावात आला. गावातील रस्त्यावरून जाताना त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. इतकंच नाहीतर जमावाने शिवीगाळ करण्यास देखील सुरूवात केली. यावेळी मातोरी गावातील तरूण आणि बाहेरून आलेल्या तरूणांमध्ये बाचाबाची झाली. बघा व्हिडीओ…
Published on: Jun 28, 2024 12:56 PM