कोल्हापुरातील विशालगडावर अज्ञातांकडून दगडफेक, नेमकं काय घडलं? स्थानिकांचा आरोप काय?

| Updated on: Jul 14, 2024 | 12:55 PM

कोल्हापुरातील विशाळगडावर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली आहे. असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेनंतर विशाळगडावर असलेलं अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीराजे विशाळगडाकडे रवाना झाले आहेत. पुणे आणि मुंबईतून हजारो शिवभक्त विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी विशाळगडाकडे रवाना....

कोल्हापुरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. कोल्हापुरातील विशाळगडावर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली आहे. असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेनंतर विशाळगडावर असलेलं अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीराजे विशाळगडाकडे रवाना झाले आहेत. छत्रपती संभाजीराजे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुणे आणि मुंबईतून हजारो शिवभक्त विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी विशाळगडाकडे रवाना झाले आहे. या शिवभक्तांना आडवले तर संघर्ष अटळ आहे, असा इशारच स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव यांनी दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या किल्ल्याने संकटात मदत केली तोच विशाळगड किल्ला संकटात आहे, आज विशाळगडाचे अतिक्रमण मुक्त करणारच, असा निर्धारच स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष अंकुश कदम यांनी व्यक्त केला.

Published on: Jul 14, 2024 12:55 PM
अहिराणी अन् खान्देशी गाण्यांवर झुंबा… ZP शाळेतील शिक्षक-विद्यार्थ्यांचा व्हिडीओ व्हायरल
Kokan Rain Update : ‘जगबुडी’नं ओलांडली धोक्याची पातळी, पाणी पुलावर अन् खेड-दापोली मार्ग बंद