ऊस दराबाबत फेरविचार न केल्यास ऊस तोड बंद करण्याचा शेतकऱ्यांचा निर्णय
येत्या आठवडा भरात २७०० रुपयांचा दर जाहीर केला नाही तर तीव्र आंदोलन करत जिल्ह्यात कुठेही ऊस तोडणी होऊ देणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली जात असते जिल्ह्यात तीन साखर कारखाने आणि खंडसरी आहेत तसेच गुजरात मधील काही कारखाने ऊस घेऊन जात असतात मात्र सर्वांचे ऊस दर वेगेगळया प्रकारचे आहेत.यात कारखाने वाहतूक खर्च आधिक लावुन शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत.या सर्व बाबी साखर आयुक्त जिल्हा प्रशासन आणि कारखानदार यांच्या लक्षात आणून दिल्या आहेत तरी दर संदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही .म्हणून शेतकरी संघर्ष समिती आक्रमक झाली असून येत्या आठवडा भरात २७०० रुपयांचा दर जाहीर केला नाही तर तीव्र आंदोलन करत जिल्ह्यात कुठेही ऊस तोडणी होऊ देणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्था प्रश्नाला सर्वशी जिल्हा प्रशासन आणि कारखाने जबाबदार राहतील असा इशारा शेतकरी संघर्ष समितीचे नेते आभिजित पाटील यांनी दिला आहे.