Raj Thackeray | आधी आत्महत्या थांबवा, ही माझी अट आहे, राज ठाकरेंची एसटी कर्मचाऱ्यांना अट

| Updated on: Nov 11, 2021 | 5:03 PM

आत्महत्या करू नका. आत्महत्या करून डाव अर्धवट सोडू नका. ही लढाई आपल्याला लढायची आहे. त्यासाठी मनगटात रक्त आणि ताकद असायला हवी, असं सांगतानाच आत्महत्या करणाऱ्यांचं मी नेतृत्व करणार नाही ही माझी अट आहे. त्यामुळे आत्महत्या थांबवा, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एसटी कामगारांना केलं आहे.

आत्महत्या करू नका. आत्महत्या करून डाव अर्धवट सोडू नका. ही लढाई आपल्याला लढायची आहे. त्यासाठी मनगटात रक्त आणि ताकद असायला हवी, असं सांगतानाच आत्महत्या करणाऱ्यांचं मी नेतृत्व करणार नाही ही माझी अट आहे. त्यामुळे आत्महत्या थांबवा, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एसटी कामगारांना केलं आहे. एसटी कामगारांच्या शिष्टमंडळाने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेऊन त्यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. कायदेशीर बाजू आणि त्यांचं म्हणणं एसटी कामगारांनी मांडलं. एसटी कामगार नेत्यांनी पोटतिडकीने आपलं म्हणणं मांडतानाच आमचा प्र त्यावेळी राज ठाकरे यांनी मी तुमच्या लढ्याचं नेतृत्व करेन. पण तुम्ही आत्महत्या करू नका ही माझी अट आहे, असं सांगितलं. तसेच मी याबाबत राज्य सरकारशी चर्चा करून तुमच्याशी पुन्हा बोलतो, असं आश्वासनही राज ठाकरे यांनी कामगारांना दिलं. राज ठाकरे आणि कामगारांनामध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली.

Published on: Nov 11, 2021 04:55 PM
Chandrakant Patil | उद्धव ठाकरे यांना सरकारी रुग्णालय का चालत नाही? चंद्रकांत पाटलांचा सवाल
Raj Thackeray | आमच्या पगाराच्या वेळी पैसे कसे नसतात, ठाकरेंसमोर एसटी कर्मचाऱ्यांनी मांडल्या व्यथा