पुण्यात MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी स्ट्रीट लाईट बंद, मोबाईल टॉर्च लावून आंदोलन सुरूच
VIDEO | विद्यार्थ्यांना त्रास व्हावा म्हणून स्ट्रीट लाईट बंद करणाऱ्या कपटी सरकारचा निषेध, या राष्ट्रवादी नेत्याची टीका
पुणे : पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणचा स्ट्रीट लाईट बंद करण्यात आल्या होत्या. त्यावेळी आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईलच्या टॉर्च लावत आंदोलन सुरूच ठेवल्याचे पाहायला मिळाले. आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणचा स्ट्रीट लाईट बंद करण्यात आलेल्या ठिकाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आंदोलनस्थळी हजेरी लावली. यावेळी जयंत पाटील यांचं स्वागत विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या टॉर्च लावून केल्याचे पाहायला मिळालं. दरम्यान, पुण्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी स्ट्रीट लाईट बंद केल्या असल्या तरी विद्यार्थी आंदोलनावर ठाम होते आणि काळोख्या अंधारात देखील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच आहे. दरम्यान, एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी एमपीएससीच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. तर राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी देखील सरकारला इशारा दिला आहे.