Chandrapur मध्ये अज्ञात युवतीचा मृतदेह आढळल्याने परिसरात भीतीचं वातावरण
या युवतीचे डोके निर्दयीपणे उडविण्यात आले आहे. युवतीचे डोके शोधण्याचा पोलिस आणि फॉरेन्सिक टीम प्रयत्न करीत आहेत. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक स्वतः घटनास्थळी दाखल झाले. युवतीची ओळख पटवण्याचा पोलिस प्रयत्न करीत आहेत.
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात एका युवती (Young Girl)चा नग्नावस्थेत डोके छाटलेला मृतदेह (Deadbody) सापडल्याने खळबळ उडाली आहे. भद्रावतीच्या ITI मागील भागात ही घटना उजेडात आली. घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलीस, फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. या युवतीचे डोके निर्दयीपणे उडविण्यात आले आहे. युवतीचे डोके शोधण्याचा पोलिस आणि फॉरेन्सिक टीम प्रयत्न करीत आहेत. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक स्वतः घटनास्थळी दाखल झाले. युवतीची ओळख पटवण्याचा पोलिस प्रयत्न करीत आहेत.