अनिल परब यांच्याविरोधात कठोर कारवाई होणारच- किरीट सोमय्या

| Updated on: Jul 22, 2022 | 4:43 PM

"महाविकास आघाडीचं सरकार हे बांधकाम पाडण्याचं काम करत नव्हतं. आता ती जबाबदारी या सरकारवर आहे. या सगळ्याच प्रकरणी अनिल परब यांच्यावर कठोर कारवाई होणारच," अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

“अनिल परब यांच्यासंबंधी एकाच वेळी पाच कारवाया सुरू आहेत. ईडीची सुनावणी सुरू आहे. मला असा विश्वास आहे की ईडीकडे जे अंतिम डॉक्युमेंटेशन्स आहेत, ते आले आहेत. म्हणून ईडीची पुढची कारवाई अपेक्षित आहे. इनकम टॅक्सने धाडी घातल्या होत्या आणि त्यात बेनामी प्रॉपर्टी घोषित करता येणार का, याचा मी पाठपुरावा करत आहे. महाविकास आघाडीचं सरकार हे बांधकाम पाडण्याचं काम करत नव्हतं. आता ती जबाबदारी या सरकारवर आहे. या सगळ्याच प्रकरणी अनिल परब यांच्यावर कठोर कारवाई होणारच,” अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

Mohan Mate ON CM | देवेंद्र फडणवीस हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, आमदार विकास मतेंच्या विधानाने पुन्हा वादंग, भाजप नेत्यांच्या मनातील धुसफूस चव्हाट्यावर
कट्टर शिवसैनिकांचा अपमान करु नका; दीपिक केसरकरांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर