Lok Sabha Election 2024 : डबल मतदान कराल तर गोत्यात याल… निवडणूक आयोगानं काय दिला इशारा?

| Updated on: Mar 16, 2024 | 5:21 PM

देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. यावेळी राजीव कुमार यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या

नवी दिल्ली, १६ मार्च २०२४ : केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर केल्यात. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. यावेळी राजीव कुमार यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्यात. निवडणुकीदरम्यान, राजकीय पक्ष आणि नेत्यांसाठी नियमावलीही जाहीर करण्यात आली. आगामी निवडणुकीदरम्यान दोन वेळा मतदान करणाऱ्यांवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिला आहे. दारू आणि साड्या वाटप करण्याच्या गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. तसेच निवडणुकीत कोणत्याही प्रकारे पैशाचा गैरवापर होऊ देणार नाही. मनी आणि मसल पॉवरला निवडणुकीत थारा राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

Published on: Mar 16, 2024 05:21 PM
लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर, पहिल्या टप्प्यातील मतदान ‘या’ दिवशी होणार
महाराष्ट्रात कोणत्या टप्प्यात किती जागांवर मतदान? तुमच्याकडचं मतदान कधी? बघा सविस्तर