Satara | कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता राज्यात निर्बंध लागू, महाबळेश्वरमधील पर्यटनाला फटका

| Updated on: Jan 09, 2022 | 4:07 PM

राज्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असल्याचं चित्र आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. राज्य सरकारने कडक निर्बंध लादल्याचा महाबळेश्वरमधील पर्यटनाला फटका बसला आहे.

राज्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असल्याचं चित्र आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. त्या नियमावलीनुसार आता राज्यात 10 जानेवारीपासून रात्रीची संचारबंदी लागू असणार आहे. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालये, मॉल, शॉपिंग मॉल, मैदानं, उद्याने, चित्रपट गृहे, केशकर्तनालय, सरकारी आणि खासगी कार्यालये आदींसाठी ही नियमावली लागू करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे मुंबई लोकल प्रवासासाठी कुठलेही निर्बंध लावण्यात आलेले नाहीत.

>> रात्री 11 ते सकाळी 5 कर्फ्यू
>> मैदानं, उद्यानं पर्यटन स्थळ बंद
>> शाळा कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद
>> थिएटर 50 टक्के क्षमतेनं सुरु राहणार
>> सलून आणि खासगी कार्यलय 50 टक्के क्षमतेनं सुरु
>> पूर्ण लसीकरण झालेल्यांना सार्वजनिक बसनं वाहतूक करण्यास मुभा
>> हॉटेल रेस्टॉरंट फक्त रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास मुभा
>> स्विमिंग पूल, स्पा, व्यायामशाळा पूर्णपणे बंद

Published on: Jan 09, 2022 03:29 PM
VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 09 January 2022
Chandrakant Patil | सरकारला पोटापेक्षा नशेची पडलेली : चंद्रकांत पाटील