ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नागपुरात कडक निर्बंध, नववर्षाच्या पार्ट्यांना बसणार चाप
पुन्हा एकदा देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. नागपुरात देखील कोरोनाचे रुग्ण वाढल्याचे दिसून येत आहेत. तसेच ओमिक्रॉनने देखील शिरकाव केला आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.
नागपूर : पुन्हा एकदा देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. नागपुरात देखील कोरोनाचे रुग्ण वाढल्याचे दिसून येत आहेत. तसेच ओमिक्रॉनने देखील शिरकाव केला आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. नववर्षांच्या निमित्ताने मोठ्याप्रमाणात पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. पार्ट्यांना झालेल्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. त्यामुळे अशा पार्ट्यांवर पोलिसांची कडरी नजर असून, कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.