Sangli Lockdown | सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध, अत्यावश्यक सेवांना परवानगी
देशासह राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काही अंशी अनलॉक करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर काही शहरांमध्ये पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोकादेखील वाढताना दिसत आहे.
देशासह राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काही अंशी अनलॉक करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर काही शहरांमध्ये पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोकादेखील वाढताना दिसत आहे. यामुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सांगली महापालिकेकडून कोरोना चाचणीवर अधिक भर दिला जात आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी आणि गर्दीच्या वस्त्यांमध्ये कोरोना तपासणी सुरु करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.