Rajesh Tope | ज्या भागात जास्त कोरोना रुग्ण तिथे कडक निर्बंध लावणार : राजेश टोपे

| Updated on: Jan 04, 2022 | 5:10 PM

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, सध्या लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झालेली नाही. या परिस्थितीत तरी लॉकडाऊन हा पर्याय नाही, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, सध्या लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झालेली नाही. या परिस्थितीत तरी लॉकडाऊन हा पर्याय नाही, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. राजेश टोपे यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. जिथे काही प्रॉब्लेम नाहीय तिकडे लॉकडाऊनचा विषय नाही. 40 टक्क्यांच्यावर बेड्स भरल्यानंतर लॉकडाऊनचा विचार करणार, मात्र आता तशी परिस्थिती नाही. आता 10 टक्केही बेड्स भरलेले नाहीत, असं टोपेंनी सांगितलं.

मागील काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. यामध्ये नव्या कोरोनाबाधिकांपैकी जवळपास 80 टक्के रुग्णांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. म्हणजेच लसीच्या दोन्ही मात्रा घेऊनही कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण बरेच आहे. यामुळे लसीच्या प्रभाव क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. तसेच लस घेतली असली तरी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियम म्हणजेच मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, तसेच सॅनिटायझरचा वापर करणे याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Abdul Sattar | रश्मी ठाकरे पडद्यामागून राजकारणाची सूत्र सांभाळतात : अब्दुल सत्तार
Rajan Vichare | शिवसेना खासदार राजन विचारे यांना कोरोनाची लागण