Special Report | Bandyatatya Karadkar यांना NCP कडून माफी नाही ? -tv9
भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे या दारु पितात, नाचतात असं वादग्रस्त विधान करणं बंडातात्या कराडकर यांना चांगलंच भोवलं आहे. बंडातात्या कराडकर यांच्या या विधानाचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी बंडातात्या कराडकर यांचे पुतळे जाळले जात आहेत.
सातारा: भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे या दारु पितात, नाचतात असं वादग्रस्त विधान करणं बंडातात्या कराडकर यांना चांगलंच भोवलं आहे. बंडातात्या कराडकर यांच्या या विधानाचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी बंडातात्या कराडकर यांचे पुतळे जाळले जात आहेत. तर काही ठिकाणी निदर्शने केली जात आहेत. गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण राज्यात बंडातात्या कराडकर यांच्या विरोधात वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे बंडातात्यांना अखेर माघार घ्यावी लागली आहे. बंडातात्यांनी आपल्या विधानावर पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे यांची माफी मागितली आहे. पंकजा मुंडे आणि सुप्रियाताई या निर्व्यसनी आहेत. सदाचारी आहेत, असं बंडातात्यांनी सांगत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
Published on: Feb 04, 2022 09:11 PM