VIDEO : Subhash Desai | गीतेेच्या विधानावर राजकीय व्यासपीठावर समाचार घेतला जाईल : सुभाष देसाई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विश्वासू सहकारी आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली होती. शरद पवार आमचे नेते होऊच शकत नाहीत, असं म्हणत त्यांनी पवारांवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता गीतेंच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विश्वासू सहकारी आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली होती. शरद पवार आमचे नेते होऊच शकत नाहीत, असं म्हणत त्यांनी पवारांवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता गीतेंच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. गीतेंच्या वक्तव्यावर सुभाष देसाई म्हणाले की, राजकीय व्यासपीठावर समाचार घेतला जाईल. तर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी देखील गीतेंच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे देशाचे नेते आहेत, असं म्हणत त्यांनी गीतेंच्या वक्तव्यावर एकप्रकारे नाराजी व्यक्त केली आहे.