चांद्रयान-3 यशस्वी लँडिंगनंतर पंतप्रधान मोदी यांच ऐतिहासिक भाषण; म्हणाले,‘ अब चंदा मामा दूर के नही…’,

| Updated on: Aug 23, 2023 | 8:54 PM

VIDEO | 2019 मध्ये अपूर्ण राहिलेलं स्वप्न आज साकार, भारताच्या चांद्रयान-3 चं चंद्रावर यशस्वी लँडिंगनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचं कौतुक, काय केलं ऐतिहासिक भाषण?

डरबन, २३ ऑगस्ट २०२३ | चंद्रयान ३ च्या यशस्वी लँडिंगनंतर संपूर्ण देशात आनंद बघायला मिळत आहे. चंद्रयान ३ च्या यशस्वी लँडिंग होणं ही देशातील प्रत्येकासाठी अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे. इस्त्रोच्या या यशस्वी कामगिरीमुळे इस्त्रोच्या संपूर्ण टीमचं देशभरातून कौतुक केले जात आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. मोदी म्हणाले. “कधी म्हटलं जायच चंद्रमामा लांब आहे . पण आता एकदिवस असाही येईल, जेव्हा मूल म्हणतील चंदामामा फक्त एका टूरचे आहेत” असं मोदी म्हणाले. “हा अविस्मरणीय क्षण आहे. हा क्षण शंखनादाच आहे. नव्या भारताच्या जयघोषणाचा क्षण आहे. अडचणींचा महासागर पार करण्याचा क्षण आहे. हा 140 कोटी देशवासियांच्या सामर्थ्याचा आहे. आपण हे ऐतिहासिक क्षण अनुभवतो, तेव्हा अभिमान वाटतो. ही नव्या भारताची पहाट आहे. आपण जमिनीवर संकल्प केला आणि चंद्रावर स्वप्न साकार केलं. भारत आता चंद्रावर पोहोचला आहे.”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Published on: Aug 23, 2023 08:54 PM
चांद्रयान ३ चं चंद्रावर यशस्वी लँडिंग अन् मोहीम फत्ते, चंद्रावर फडकला तिरंगा
भारताची चांद्रयान ३ मोहीम फत्ते; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया, म्हणाले…