चांद्रयान ३ चं चंद्रावर यशस्वी लँडिंग अन् मोहीम फत्ते, चंद्रावर फडकला तिरंगा

| Updated on: Aug 23, 2023 | 8:36 PM

VIDEO | अभिनंदन भारत... चंद्रावर चांद्रयान 3 चं झालं सॉफ्ट लँडिंग, चंद्रयान 3 मोहिमेसाठी 3 वर्षे 9 महिने आणि 14 दिवसांचा कालावधी लागला. इस्त्रोच्या या यशस्वी कामगिरीमुळे संपूर्ण टीमवर देशभरातून कौतुकाचा वर्षाव..

मुंबई, २३ ऑगस्ट २०२३ | चंद्रयान ३ च्या यशस्वी लँडिंगनंतर संपूर्ण देशात आनंद बघायला मिळत आहे. चंद्रयान ३ च्या यशस्वी लँडिंग होणं ही देशातील प्रत्येकासाठी अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे. इस्त्रोच्या या यशस्वी कामगिरीमुळे इस्त्रोच्या संपूर्ण टीमचं देशभरातून कौतुक केले जात आहे. या कामगिरीनं अंतराळ इतिहासात इस्त्रोनं नवा अध्याय लिहीला आहे. दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा भारत हा पहिला देश आहे. देशाच्या कानाकोऱ्यात एकच आता जल्लोष बघायला मिळत आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार प्रत्येक भारतीयाला व्हायचे होते. चंद्रयान 3 (Chandrayaan 3) च्या यशस्वी लँडिंगनंतर प्रत्येक जण शास्त्रज्ञांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. चंद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आपल्या भाषणातून शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.

Published on: Aug 23, 2023 08:36 PM
चिमुकल्या फॅनच्या भेटीसाठी राज ठाकरे पोहोचले थेट या मनसैनिकाच्या घरी
चांद्रयान-3 यशस्वी लँडिंगनंतर पंतप्रधान मोदी यांच ऐतिहासिक भाषण; म्हणाले,‘ अब चंदा मामा दूर के नही…’,