चंद्रावर भारताचं पाऊल, नेमकं कसं झालं चांद्रयान -3 चं लँडिंग? ‘ते’ १० सेकंद अन् भारत चंद्रावर
VIDEO | आन...बान...भारताची शान चांद्रयान..., चंद्रयान ३ च्या यशस्वी लँडिंग होणं ही देशातील प्रत्येकासाठी अभिमानाची आणि कौतुकाची बाब... जे अमेरिकेला जमलं नाही ते भारतानं केलं, नेमकं कसं झालं चांद्रयान -3 चं लँडिंग?
मुंबई, २३ ऑगस्ट २०२३ | चांद्रयान ३ ची मोहीम यशस्वी झाली. भारतानं आपली छाप जगात उमटवली. इस्त्रोच्या शानदार कामगिरीमुळे चंद्रावर पाऊल ठेवलं आहे आणि दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. फक्त भारतच नाही तर अमेरिकेच्या नासासह जगभरातील देशाच्या नजरा ज्या क्षणाकडे होत्या तोच हा क्षण…चांद्रयान ३ चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या लँड झालं आणि भारतानं इतिहास रचला आणि संपूर्ण भारतात एकच जल्लोष झाला. चंद्रयान ३ च्या यशस्वी लँडिंग होणं ही देशातील प्रत्येकासाठी अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे. इस्त्रोच्या या यशस्वी कामगिरीमुळे इस्त्रोच्या संपूर्ण टीमचं देशभरातून कौतुक केले जात आहे. आतापर्यंत जी कामगिरी कोणी केली नाही. अशी कामगिरी करत त्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ भारतानं पहिलं पाहिल ठेवलंय. नेमकं कसं झालं चांद्रयान -3 चं लँडिंग? बघा टिव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट