sudhir mungantiwar | विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

| Updated on: Dec 27, 2021 | 11:44 PM

विधानसभा अध्यक्षपदावरुन सत्ताधारी, विरोधक आणि राज्यपाल यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे. अभ्यास करुन विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेऊन असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदावरुन सत्ताधारी, विरोधक आणि राज्यपाल यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे. अभ्यास करुन विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेऊ असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे सरकार एक वर्ष झोपलं होतं का. 12 निलंबित आमदारांच्या मतदानाचा हक्क डावलून बँक डोअर इन्ट्री घेऊ शकत नाही. राज्यपाल महोदयांकडे आमचा कोणताही प्रस्ताव नाही. राज्यपाल महोदय कायद्याची तपासणी करतायेत त्यांना थोडा वेळ द्यायला हवा, असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय.
Panaji | सार्वजनिक ठिकाणी अरविंद केजरीवाल यांचे पोस्टर्स, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी दर्शविला आक्षेप
Video | रामदास आठवले म्हणजे आंबेडकरी चळवळीला लागलेला कलंक – आनंदराज आंबेडकर