संजय राऊत यांचे पक्ष खरेदीचे आरोप म्हणजे…, सुधीर मुनगंटीवार यांनी पलटवार करत थेट साधला निशाणा
VIDEO | सत्तेवर आणि खुर्चीवर प्रेम करणाऱ्यांची अशीच अवस्था होते, सुधीर मुनगंटीवार यांचा संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल
चंद्रपूर : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केला असून शिवसेना नाव आणि पक्षाचं चिन्ह घेण्यासाठी 2000 कोटी रूपयांचा व्यवहार झाल्याचे ते म्हटले आहे. यावर सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केले असून त्यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांचे पक्ष खरेदीचे आरोप म्हणजे लोकशाही संस्थांवर विश्वास नसल्याचा पुरावा आहे. तर संजय राऊत यांच्या पक्ष खरेदीच्या वक्तव्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया देताना असेही म्हटले की, सत्ता गेली की खुर्चीवर प्रेम करणारे अशाच प्रकारे संवैधानिक संस्थांचा अपमान करतात. हा फक्त निवडणूक आयोग किंवा सर्वोच्च न्यायालय अशा संवैधानिक संस्थांचा अपमान नसून लोकशाहीचा आणि स्वातंत्र्यवीरांचा अपमान आहे, लोकशाहीचा अपमान करणाऱ्या अशा लोकांचं डोकं मतदार निवडणूकीत ठिकाणावर आणतील असेही मुनगंटीवार म्हणाले.