महाविकास आघाडी सरकारचा माज संपला पाहिजे- सुधीर मुनगंटीवार
विधान परिषद निवडणुकीतही आमच्यात फूट पडू शकत नाही, हे देशाला दाखवायचं आहे. महाराष्ट्राच्या शहाणपणापुढे तुमचा सत्तेचा माज चालणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपला दिला होता.
“स्वार्थ, खुर्ची याच्या पुढे जायला तयार नाही. आज जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना पूर्ण अडीच वर्षात फक्त आणि फक्त दारुच्या संदर्भात निर्णय घेणे म्हणजे राज्याची प्रगती, उन्नती.. हा चुकीचा भ्रम या सरकारमध्ये होता. तो उतरला पाहिजे. हा माज संपला पाहिजे. या अंहकाराचं हरण झालं पाहिजे, हे या निवडणुकीच्या मागची भूमिका आहे”, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले. राज्यसभा निवडणुकीत शिवसेना आणि सहकारी पक्षांच्या आमदाराचे एकही मत फुटलं नव्हतं. विधान परिषद निवडणुकीतही आमच्यात फूट पडू शकत नाही, हे देशाला दाखवायचं आहे. महाराष्ट्राच्या शहाणपणापुढे तुमचा सत्तेचा माज चालणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपला दिला होता.
Published on: Jun 20, 2022 03:43 PM