Sudhir Mungantiwar: “एकवीरेची शपथ कुणी खोटी ठरवली?”, सुधीर मुनगंटीवार यांचा उद्धव ठाकरेंना टोला
"बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शपथ दिली की आयुष्यात आम्ही काँग्रेससोबत जाणार नाही. कुणी खोटी ठरवली ही शपथ", असं सुधीर मुनगंटीवार विधानसभेत म्हणाले.
“काही लोक आता प्रभू रामाच्या मंदिरात जातात आणि ज्यांनी जनादेशाचा अपमान केला, हिंदुत्वाचा अपमान केला, काल्पनिक पात्र म्हणून जे रामाला म्हणायचे, त्यांच्या मांडीला मांडी लावून आता बसलेत. मला आठवतंय 16 मार्च 1995 रोजी भाजप-शिवसेनेचे आमदार निवडून आले. स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांनी सांगितलं आम्हाला कार्ल्याच्या एकवीरा मंदिरात जायचंय. आम्ही सर्वजण एकवीरा मंदिरात गेलो. काय शपथ घेतली होती आम्ही? बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शपथ दिली की आयुष्यात आम्ही काँग्रेससोबत जाणार नाही. कुणी खोटी ठरवली ही शपथ”, असं सुधीर मुनगंटीवार विधानसभेत म्हणाले.
Published on: Jul 04, 2022 03:08 PM