संजय राऊत यांना खोटं बोलण्याचं व्यसन, ‘सामना’तून केलेल्या दाव्यावर भाजपचा पलटवार

| Updated on: May 26, 2024 | 1:42 PM

नितीन गडकरी यांच्या पराभवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र प्रयत्न केलेत, असे संजय राऊत यांनी म्हटले. सामना या वृत्तपत्रातील रोखठोक या सदरातून संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला. या दाव्यावर भाजपकडून पलटवार करण्यात आला

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांना खोटं बोलण्याचं व्यसन लागलंय, असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. सामनामधील रोखठोकवरून सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊत यांच्यावर ही टीका केली आहे. नितीन गडकरी यांच्या पराभवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र प्रयत्न केलेत, असे संजय राऊत यांनी म्हटले. सामना या वृत्तपत्रातील रोखठोक या सदरातून संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला. ‘संजय राऊत जर खोटं बोलले नाही तर त्यांना कसतरी होत असावं. म्हणून त्यांना खोटं बोलण्याचं व्यसन लागलं आहे. तर भाजपमध्ये मीठ कालवता येईल का याचा असफल प्रयत्न हा सुपीक डोक्यातून नापिक आयडिया करून ते करताय.’, असं सुधीर मुनगंटीवार यांनी राऊतांवर टीका करताना म्हटलं आहे.

Published on: May 26, 2024 01:42 PM
माझी आवडती कार? माझा बाप बिल्डर… पुणे अपघातानंतर त्याच ठिकाणी निबंध स्पर्धा; जिंकणाऱ्याला मिळणार ‘हे’ बक्षीस
कीड काढण्यासाठी सर्जरी कधी? पुणे पालिकेच्या अधिकाऱ्याच्या निलंबनावरून रोहित पवारांची टीका, थेट शिंदेंना सवाल