‘वाघनखं आणूनही तुम्ही दिल्लीची गुलामीच करणार’, कुणाचा शिंदे सरकारवर हल्लाबोल?

| Updated on: Oct 01, 2023 | 3:45 PM

VIDEO | छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं आणण्यावरून राजकीय वर्तुळात वार-पलटवार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना त्यांच्या 'त्या' जुन्या वक्तव्याची आठवण करून देत सुधीर मुनगंटीवार यांनी राऊतांवरच पलटवार केलाय, बघा काय दिलं प्रत्युत्तर?

मुंबई, १ ऑक्टोबर २०२३ | वाघनखं आणूनही तुम्ही दिल्लीची गुलामीच करणार असल्याचे म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर हा निशाणा लगावला आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास हे सगळे मराठी माणसाला नव्हे तर जगाला प्रेरणादायी आहे. पण ही वाघनखं आणून आपण काय करणार आहात? परत दिल्लीची गुलामीच करणार आहात ना. एकप्रकारे ही वाघनखं आणून तुम्ही या वाघनखांचा अपमान करत आहात. कारण आपण महाराष्ट्राला दिल्लीचे गुलाम केले आहे.’, असे संजय राऊत म्हणाले. तर संजय राऊत यांनी छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागितले होते, असे म्हणत संजय राऊत यांना त्यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण सुधीर मुनगंटीवार यांनी करून देत त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखं यासाठी वापरली की त्यांना महाराष्ट्राला गुलामीतून मुक्त करायचं होते आणि हे गुलाम ज्यांनी महाराष्ट्राला दिल्लीचे पायपुसणे केलेले आहे ते इथे गुलाम महाराष्ट्रात वाघनखं आणून शिवरायांचा अपमान करत आहेत, असे राऊतांनी म्हणत शिंदे सरकारवर हल्लाबोल केलाय.

Published on: Oct 01, 2023 03:45 PM
Vande Bharat Express : वंदेभारत एक्सप्रेसची सुसाट सफाई, अवघ्या १४ मिनिटांत पूर्ण ट्रेन होणार एकदम चकाचक
‘एकनाथ शिंदे हे वाघ’, असे म्हणत शहाजीबापू पाटील यांनी कुणाला डिवचलं?