Sudhir Mungantiwar | शपथनामा क्रूझ पार्टीत पत्ती मारुन लिहिला नाही ना? मुनगंटीवारांचा परबांना सवाल
एसटी कामगारांच्या मागण्या शपथ पत्रात, मोठी भाषणं केली, अनिल परब स्वता म्हणाले होते, शपथनामा हा क्रुझ पार्टीत पत्ती मारून तर लिहीला नाही.. मग पूर्ण का करत नाहीत, असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी केला.
वैष्णोदेवीला जे घडलं ते दुर्दैवी, प्रशासनाने सोय करायला हवी होती. केंद्राने एसओपी करणं आवश्यक होतं असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. संजय राऊत काय बोलतात त्यावर भाष्य करण्याची गरज नाही. एसटी कामगारांच्या मागण्या शपथ पत्रात, मोठी भाषणं केली, अनिल परब स्वता म्हणाले होते, शपथनामा हा क्रुझ पार्टीत पत्ती मारून तर लिहीला नाही.. मग पूर्ण का करत नाहीत. शपथनाम्यात जे लिहिलंय त्यावर तुम्ही कृती करायला पाहिजे, असं सुधीर मुनंगटीवार म्हणाले. भाजपची सत्ता येणार का हा प्रश्न नाही, शुन्यातून सत्तेत पोहोचण्यासाठी काम करणार, असल्याचं सुधीर मुनगंटीवर म्हणाले.