छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं ‘या’ दिवशी महाराष्ट्रात, कुठे घेता येणार दर्शन?

| Updated on: Jul 11, 2024 | 5:22 PM

शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी,... सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांबाबत विधानसभेत आज निवेदन सादर केलं. यावेळी त्यांनी वाघनखं भारतात आणण्यासाठी किती खर्च झाला? किती वर्ष ही वाघनखं आपल्याकडे राहणार याची सविस्तर माहिती दिली. बघा काय म्हणाले?

सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांबाबत विधानसभेत आज निवेदन सादर केलं. यावेळी त्यांनी वाघनखं भारतात आणण्यासाठी किती खर्च झाला? किती वर्ष ही वाघनखं आपल्याकडे राहणार याची सविस्तर माहिती दिली. येत्या 19 जुलैला ही वाघनखं साताऱ्याच्या शासकीय म्युझियममध्ये छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि तिथले सरदार यांच्या उपस्थितीत ही वाघनखं दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी वाघनखं भारतात आणण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आल्याच्या मुद्द्यावरही भाष्य केले. आपल्या अधिवेशनाचा एका दिवसाचा खर्च जेवढा आहे, त्याच्या कितीतरी पट कमी खर्च हा वाघनख आणण्यासाठी झाला. वाघनखं आणण्यासाठी 14 लाख 8 हजारांचा खर्च झाला. ही वाघनखं आणण्यासाठी कुठल्याही प्रकारचे भाडे दिले जाणार नाही. ते कधीही दिले जात नव्हते, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले. पुढे ते असेही म्हणाले, शिवाजी महाराज आपला आत्मा आहे. अनेकांनी ही वाघ नखं मिळावी यासाठी पत्रव्यवहार केला. त्यानुसार आपण भारत आणि ब्रिटन यांच्यात एक सामंजस्य करार केला. त्यानंतर ही वाघ नखं आपल्याकडे तीन वर्ष राहील असा निर्णय झाला आहे.

Published on: Jul 11, 2024 05:18 PM