Bhaskar Jadhav: ‘महाराष्ट्रातही आता महाभारत होणार’; भास्कर जाधव यांच्या वक्तव्यावर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर

| Updated on: Jul 04, 2022 | 3:27 PM

छातीचा कोट करून शिवसैनिक सेना वाचवण्यासाठी तयार आहे. महाराष्ट्रामध्येसुद्धा आता महाभारत होणार , असंही ते म्हणाले. दरम्यान महाभारताची भाषा करणार तुम्ही कौरव आहात, असं प्रत्युत्तर सुधीर मुनगंटीवार यांनी भास्कर जाधवांना दिलंय.

विधानसभेत भास्कर जाधव यांनीसुद्धा जोरदार बॅटिंग केली. गेले आठ दिवस मी अस्वस्थ आणि विचलित आहे, असं ते म्हणाले. आमदार तुमच्याबरोबर गेले मात्र शिवसैनिक सेना वाचवण्यासाठी खंबीर आहे असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय. छातीचा कोट करून शिवसैनिक सेना वाचवण्यासाठी तयार आहे. महाराष्ट्रामध्येसुद्धा आता महाभारत होणार , असंही ते म्हणाले. दरम्यान महाभारताची भाषा करणार तुम्ही कौरव आहात, असं प्रत्युत्तर सुधीर मुनगंटीवार यांनी भास्कर जाधवांना दिलंय.

आम्ही बंड नाही उठाव केला- गुलाबराव पाटील
देवेंद्र फडणवीसांचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला