… तर हे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना अभिवादन राहिलं असतं, सुजात आंबेडकर यांनी काय व्यक्त केली खंत
राज्यभरातील अनुयायी महामानवाला अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमीवर दाखल होत आहे. आज सर्वसामान्य अनुयायांसोबतच राजकीय नेते मंडळींनी देखील चैत्यभूमीवर दाखल होत बाबासाहेबांना नमन केल्याचे पाहायला मिळाले. तर यावेळी सुजात आंबेडकर देखील हजर होते. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी काही मुद्द्यांवर भाष्य केले.
मुंबई, ६ डिसेंबर २०२३ : ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यभरातील अनुयायी महामानवाला अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमीवर दाखल होत आहे. आज सर्वसामान्य अनुयायांसोबतच राजकीय नेते मंडळींनी देखील चैत्यभूमीवर दाखल होत बाबासाहेबांना नमन केल्याचे पाहायला मिळाले. तर यावेळी सुजात आंबेडकर देखील हजर होते. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी काही मुद्द्यांवर भाष्य केले. डॉक्टर बाबासाहेब यांचा पुतळा हा सुप्रीम कोर्टात उभा राहिला ही आनंदाची बातमी असली तरी ही एक दुःखाची बाब देखील आहे. कारण इतक्या वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा राहिला. तर जसा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा सुप्रीम कोर्टात उभा राहिला आहे, त्याप्रमाणे राजस्थान मधल्या हायकोर्टामधला मनुचा पुतळा लवकर उतरला जाईल, असे म्हणत त्यांनी आशा व्यक्त केली. यासोबतच इंदू मिलच्या बाबासाहेब पुतळ्याऐवजी तेथे एक थिंक टँक किंवा एखादं रिसर्च इन्स्टिट्यूट उभी केलं असती तर बाबासाहेबांना खऱ्या आर्थाने अभिवादन राहिले असते, असे म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली.