Sujay Vikhe Patil यांची मविआ सरकारवर टीका
महाविकास आघाडीचा संसार असा आहे, लग्न हे राष्ट्रवादी शिवसेनेचं आहे, राष्ट्रवादी हे नवऱ्याच्या भूमिकेत आहे, शिवसेना ही मूक बायकोच्या भूमिकेत आहे तर काँग्रेस हे बिनबुलाये वऱ्हाडी आहेत, त्यांना कितीही बोललं तरी हे जेवणाचा ताट सोडायला तयार नाहीत अशी टीका भाजप खासदार सुजय विखे यांनी केली आहे.
अहमदनगर : शिवसेना आणि भाजपचा (Bjp-Shivsena Alliance) मागच्या विधानसभा निवडणुकीनंतर काडीमोड झाला. त्यानंतर राज्यात महाविकास (Mahavikas Aghadi) आघाडी स्थापन झाली. गेली अडीच वर्षे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस सरकार चालवत आहे. मात्र या आघाडीवर भाजप खासदार सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांनी घणाघाती टीका केली आहे. तसेच ईडीच्या कारवाईवरूनही त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय. महाविकास आघाडीचा संसार असा आहे, लग्न हे राष्ट्रवादी शिवसेनेचं आहे, राष्ट्रवादी हे नवऱ्याच्या भूमिकेत आहे, शिवसेना ही मूक बायकोच्या भूमिकेत आहे तर काँग्रेस हे बिनबुलाये वऱ्हाडी आहेत, त्यांना कितीही बोललं तरी हे जेवणाचा ताट सोडायला तयार नाहीत अशी टीका भाजप खासदार सुजय विखे यांनी केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून यावर जोरदार प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.