मुंबईकरांना तणावमुक्त करण्यासाठी पोलिसांचे ‘संडे स्ट्रीट’
मुंबईकरांना तणावमुक्त करण्यासाठी आता पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. मुंबई पोलिसांच्या पुढाकारातून संडे स्ट्रीट नावाची संकल्पना राबवण्यात आली आहे.
मुंबईकरांना तणावमुक्त करण्यासाठी आता पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. मुंबई पोलिसांच्या पुढाकारातून संडे स्ट्रीट नावाची संकल्पना राबवण्यात आली आहे. या संकल्पनेनुसार मुंबईतील काही रस्त्ये दुहेरी तर काही रस्ते एकेरी दर रविवारी सकाळी सहा ते दहा या वेळेत वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. या वेळेत मुंबईकरांना या रस्त्यांवर योगा, स्केटिंग, सायकलिंग सोबतच मनोरंजनाचा देखील आनंद घेता येणार आहे.