कालच जेलमधून सुटका अन् आता परत गुन्हा, सुनील केदार अडचणीत?

| Updated on: Jan 11, 2024 | 10:59 AM

जेलमधून सुटका झाल्यानंतर विनापरवानगी रॅली काढल्याने माजी मंत्री सुनील केदार यांच्यावर नागपुरातील धंतोली पोलीस ठाण्यात रात्री उशारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलीस जामीन रद्द करण्याची मागणी करणार असल्याची माहितीही मिळत आहे.

नागपूर, ११ जानेवारी २०२४ : जेलमधून सुटका झाल्यानंतर विनापरवानगी रॅली काढल्याने माजी मंत्री सुनील केदार यांच्यावर नागपुरातील धंतोली पोलीस ठाण्यात रात्री उशारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलीस जामीन रद्द करण्याची मागणी करणार असल्याची माहितीही मिळत आहे. माजी मंत्री सुनील केदार यांची नुकतीच उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर जेलमधून सुटका करण्यात आली. एक लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर सुनील केदार यांची जेलमधून जामिनावर सुटका करण्यात आली. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १५० कोटींच्या सरकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरणात सुनील केदार यांची जेलमधून जामिनावर सुटका करण्यात आली आहे. तर केदार यांची जामिनावर सुटका करण्यात आल्यानंतर त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. तर काहींनी मोठा जल्लोष करत मोठी रॅली देखील काढली. हेच प्रकरण त्यांना पुन्हा भोवलं आहे.

Published on: Jan 11, 2024 10:59 AM
सगळेच पात्र ठरले तर अपात्रतेची केस केलीच कशाला ? सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रीया
सकाळी पोपटासारखं बोलणाऱ्यांचं…, अपात्रतेच्या निकालावर नवनीत राणा काय म्हणाल्या?